शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (18:37 IST)

गरोदर महिलेचा आहार कसा असावा जाणून घ्या

Let's find out how many calories a woman should have in her diet during pregnancy. lets find out on Calorie inTake during Pregnancy health articlr in marathi webdunia marathi
गर्भावस्थेत महिलेचा आहार कसा असावा किती कॅलरी घेतली पाहिजे जाणून घेऊ या.
गर्भावस्थेत कॅलरीच्या आवश्यकतेनुसार योग्य जेवण करणे सर्वात चांगले आहे. या मुळे आईची आणि तिच्या बाळाची वाढ चांगली होते. एका गरोदर महिलेला किती कॅलरीची गरज असते आणि का? 
वजन वाढते-  
* या काळात महिलेचे वजन वाढते त्यामुळे तिला बाळाच्या वाढी साठी  वजन वाढणे आवश्यक आहे या काळात एका गरोदर महिलेचे वजन सुमारे 11 ते 16 किलो वाढते.जास्त वजन असणाऱ्या महिलेचे वजन सुमारे 4 ते 6 किलो वाढले पाहिजे. कमी वजन असणाऱ्या महिलेचे वजन किंवा एखाद्या महिलेला जुळे बाळ असतील तर तिचे वजन किमान 16 ते 20 किलो वाढले पाहिजे    
* कॅलरीची आवश्यकता असते- 
एक निरोगी गर्भावस्थेसाठी दररोज हलकं व्यायायामासह योग्य पोषक घटक असलेले आहार घेतले पाहिजे. 
बाळाच्या वाढीसह गरोदर महिलेला आपल्या आहारात कॅलरीचे प्रमाण देखील वाढविता आले पाहिजे.प्रथम ट्रायमेस्टर मध्ये कोणत्याही अतिरिक्त कॅलरीची गरज नाही. 
दुसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये एकादिवसात 340 अतिरिक्त कॅलरी घेण्यास सांगितले जाते.   
तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये सामान्य महिलेपेक्षा एका गरोदर महिलेला दररोजच्या कॅलरी पेक्षा 450 अत्याधिक कॅलरी घेण्याचा सल्ला दिला जातो. 
जुळे बाळ असल्यास अत्याधिक कॅलरी घेण्याचा सल्ला दिला जातो. 
अतिरिक्त कॅलरी असलेले पोषक घटक - यामध्ये लिन प्रथिने, अख्खे कड धान्य, लो फॅट, आणि फॅट फ्री असलेले डेयरी उत्पादन भाज्या आणि फळे समाविष्ट आहे. जास्त फॅट आणि जास्त प्रमाणात साखरयुक्त खाद्य पदार्थ जसे की सोडा,मिठाई आणि तळलेले पदार्थ कमी करून कॅलरीचे जास्त प्रमाण घेणे टाळावे. 
 
* निरोगी आहार घेण्याचे फायदे-   
* वजन वाढण्यापासून प्रतिबंध होतो.
* जेस्टेशनल मधुमेहाचे प्रतिबंध होते.
* सी-सेक्शन च्या  आवश्यकतेला कमी करते. 
*  आईला अशक्तपणा आणि संसर्गापासून वाचवता येऊ शकते. 
* बाळाच्या वेळेच्या पूर्वी जन्म होण्याची शक्यता कमी होते. 
* कमी वजन असलेले बाळ जन्माला येण्याची शक्यता कमी होते. 
बाळाची योग्य वाढ होण्यासाठी प्रत्येक ट्रायम्सटरसह आईला कॅलरीची गरज वाढते. अशा वेळी तिने योग्य आणि संतुलित आहार घ्या. जेणे करून आईची आणि बाळाची योग्य वाढ होऊ शकेल.