मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (08:10 IST)

कोरोनाला टाळायचे असल्यास या गोष्टींची काळजी घ्या

सध्या कोरोनाने सर्वीकडे उच्छाद मांडला आहे. या पासून मुक्त होण्यासाठी लोक आपापल्यापरीने काळजी घेत आहे. या पासून वाचण्यासाठी आवश्यक आहे की सुरक्षितपणे आणि समजूतदारीने पुढे जावे. जेणे करून आपण स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करू शकतो. या साठी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाच्या आहे.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1  सर्वप्रथम लक्षात ठेवा की आपण बाहेरून काहीही विकत आणलं त्याला स्वच्छ न करता घरात ठेवू नका. म्हणजे की त्यांना आधी सेनेटाईझ करा. फळ आणि भाज्या गरम पाण्याने धुऊन नंतर फ्रीजमध्ये ठेवा. 
 
2 कोणत्याही गोष्टींना स्पर्श केल्यावर आपले हात स्वच्छ करून घ्या. जर आपण घराच्या गेट किंवा नळाला किंवा बाहेरून भाज्या विकत आणल्यावर हात लावता तर सर्वप्रथम हात साबणाने धुऊन घ्या. लक्षात ठेवा ही काळजी घेतल्यावर आपण या व्हायरस पासून वाचू शकतो. 
 
3 सर्दी-पडसं जाणवत असल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क करा. घरातून बाहेर निघू नका. 
 
4 कोरोनाव्हायरसाची साखळी बनू नका. सामाजिक अंतराचे लक्षात ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. 
 
5 बाहेर जाताना मास्क लावून जावे. हातमोजे वापरा, भाजी फळे घेण्यासाठी जाताना देखील हात मोजे वापरा आणि घरी आल्यावर हात मोजे आणि मास्क डिटर्जंट ने धुऊन घ्या. 
 
6 बाहेरून आल्यावर अंघोळ न करता घरातील सदस्यांना तसेच घरातील कोणत्याही वस्तुंना स्पर्श करू नका. बाहेरून आल्यावर गरम पाण्याने स्नान करा. 
 
7 नाकाला किंवा तोंडाला हात लावणे टाळा. लक्षात ठेवा की सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग नाकाला आणि तोंडाला स्पर्श केल्याने जास्त होत आहे.
 
8 आपल्या आरोग्याची काळजी घ्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. कोमट पाणी प्यावं. 
 
9 शरीराला आजारापासून दूर करण्यासाठी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवा. आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करा. 
 
10 आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमितपणे योगा आणि व्यायामाला आपल्या दैनंदिनीमध्ये समाविष्ट करा.
 
11 तणावापासून स्वतःला दूर ठेवा. मनाला शांत ठेवा. चांगली आणि   
पुरेशी झोप घ्या.
 
12 वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छतेची काळजी घ्या. 
 
13 आपल्या आहारात अशा गोष्टींना समाविष्ट करा जे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतात जसं - तुळशीची पाने,लसूण ,हळदीचे दूध, दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. 
 
14 प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे घ्या-
संत्री, लिंबू,आवळा आपल्या आहारात समाविष्ट करा. 
 
15 दररोज सकाळी अनोश्यापोटी लसणाच्या दोन पाकळ्या खा.
 
16 अंकुरले कडधान्य खावे.
 
17 दररोज आठ ते दहा बदाम भिजत घालून सकाळी खा. भाज्या आणि फळे खाण्यासह भरपूर पाणी प्या.