मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (20:25 IST)

मधुमेहाच्या रुग्णांनी या फळांचे सेवन करू नये

असे म्हणतात की फळे कधी ही कोणाचे नुकसान करत नाही, परंतु  मधुमेहाचे रुग्ण असल्यास हे आवश्यक आहे की इतर वस्तूंसह काळजी घ्या की कोणती फळं आपल्याला घ्यायची  नाही. बऱ्याच फळांमध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण जास्त असतात , जे अचानक आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढवून आरोग्याला प्रभावित करू शकतात.म्हणून आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या फळांचे सेवन करू नये.   
 
* आंबा- आंबा असा फळ आहे जे बहुतेक लोकांना आवडतो.या मागील कारण असे ही हे फळ गोड आहे, परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी चुकून हे फळ खाऊ नये ,कारण त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आंबा कोणता ही असो त्यात साखरेचे प्रमाण जास्त आढळते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. 
 
* चिकू - मधुमेहाच्या रुग्णांसाठी चिकूचे सेवन करणे अजिबात चांगले नाही कारण या चिकूने रक्तातील साखरेची पातळीत अचानक वाढ होते ज्यामुळे रुग्णांना समस्या उद्भवू शकते,चिकूमध्ये कॅलरीचे प्रमाण देखील जास्त असतात, म्हणून कमी किंवा जास्त प्रमाणात किंवा रस स्वरूपात, कोणत्याही प्रकाराने मधुमेहाच्या रुग्णांनी हे फळ खाऊ नये. 
 
* द्राक्ष- मधुमेहाच्या रुग्णांनी द्राक्षे खाण्याच्या मुळीच लोभ करू नये. कारण द्राक्ष जरी लहान असले तरी मधुमेहाच्या रुग्णांना ह्याचं सेवन केल्याने मोठे त्रास देऊ शकतात. कारण द्राक्षात साखरेची पातळी सर्वात जास्त प्रमाणात असते या मुळे ते शरीरात मोठ्या प्रमाणात ग्लुकोज  झपाट्याने वाढवते. म्हणून ह्याचे सेवन करू नये.  
 
* केळी- आरोग्य आणि ऊर्जेसाठी केळी चांगले फळ आहे परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी केळीचे सेवन केल्याने त्यांच्या साठी हानिकारक असू शकते. एका सामान्य केळीमध्ये सुमारे 14 ग्रॅम साखर आणि 105 ग्रॅम कॅलरी आढळते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी इतक्या जास्त प्रमाणात कॅलरी आणि साखरेचे सेवन करणे चांगले नसते, म्हणून केळीचा शेक किंवा केळी मधुमेहाच्या रुग्णांनी घेऊ नये.