मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (09:20 IST)

काय सांगता, धावण्याने महिलांना या समस्या उद्भवू शकतात

धावणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे या मुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक आजार देखील दूर राहतात. आजच्या काळात महिला देखील आपल्या आरोग्या  बद्दल जागृत झाल्या आहे आणि त्या आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित  घेत आहे या साठी नियमितपणे वॉक ला जाणे, जिम ला जाणे,योगा करणे, ध्यान करणे, धावणे इत्यादी सारख्या  क्रिया कलाप करत आहे. बहुतेक महिलांना धावणे हे आवडते. परंतु जास्त प्रमाणात धावणे देखील शरीरासाठी हानिकारक असू शकते. हे महिलांच्या ब्रेस्ट पासून गर्भाशया पर्यंत प्रभाव पाडतात. अति धावण्यामुळे शरीराला काय नुकसान होऊ शकते जाणून घेऊ या. 
 
* स्तनाचा आकार खराब होऊ शकतो- 
तज्ज्ञांच्या मते, धावल्यामुळे स्तनाचा आकार खराब होऊ शकतो. कारण महिला धावताना बरीच शक्ती वापरतात. हे टाळण्यासाठी फिटिंग किंवा पॅडेड घाला.
 
* सामान्य स्त्राव- 
संशोधनानुसार, धावण्याने किंवा पोटावर दबाब पडणारे व्यायाम करताना महिलांना सौम्य स्त्राव होऊ शकतो. या साठी घाबरून जाऊ नका. धावताना पातळ लाइनर किंवा कॉटन पॅंटी घाला.
 
* संसर्गाचा धोका- 
धावताना निघालेला घाम, पुरळ, खाज येणे संसर्गाचे कारण होऊ शकतात. या व्यतिरिक्त योनी भोवती घाम येतो. या मुळे मांडीत घर्षण होत आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी धावताना कॉटन पॅंटी वापरा आणि अँटी बेक्टेरियल उत्पाद वापरा. तसेच धावणाच्या कमीत कमी 15 मिनिटा नंतर अंघोळ करा.
 
* मूत्र गळती- 
ज्या महिलांचे पेल्विक फ्लोरचे स्नायू कमकुवत असतात त्यांना धावण्याच्या दरम्यान मूत्र स्त्राव होऊ शकतो. या व्यतिरिक्त, हार्मोनल बदल, मोनोपॉझ आणि अलीकडेच बाळाला जन्म देणाऱ्या माता च्या गर्भाशयाच्या आतील बाजूस सैलपणा येतो, या मुळे धावताना मूत्र स्त्राव होऊ शकतो. 
 
* चॅफिंग किंवा पुरळ होणं- 
नियमितपणे धावणाऱ्या महिलांना चॅफिंग किंवा पुरळ येऊ शकतात. या साठी घाबरून जाऊ नका.धावणाच्या पूर्वी आपण अँटी चॅफिंग क्रीम लावून घ्या आणि कॉटन बॉटम स्नॅग घाला. या मुळे ही समस्या उद्भवणार नाही. 
धावताना या पैकी कोणतीही समस्या होऊ शकते. या साठी  घाबरून जाऊ नका. परंतु हा त्रास कायम स्वरूपी असल्यास त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.