रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (20:44 IST)

लठ्ठपणा प्रतिकारक शक्तीचा शत्रू आहे

शरीरात आजाराशी लढण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती आहे जी कोणत्याही संसर्गाविरुद्ध लढा देते.ही रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. कोरोनाकाळात रोगाविरुद्धच्या लढाईतील पहिला शत्रू लठ्ठपणा आहे.
 
आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती स्लिन (प्लीहा), बोनमॅरो (अस्थिमज्जा),टॉन्सिल्स आणि लिंफनोड्सद्वारे कार्य करते. ही प्रणाली एकत्रितरित्या लिंफोसाइट्स(पांढऱ्या रक्त पेशी) तयार करते.
डब्ल्यूबीसी मध्ये बी आणि टी पेशी असतात जे अँटीजन्स, बेक्टेरिया, व्हायरस आणि कर्करोगाच्या पेशींशी लढण्याचे काम करते.जेव्हा या पेशी अँटीजन्स रोखण्यासाठी असक्षम असतात तेव्हा व्यक्तीला सर्दी, पडसं, असाध्य संसर्ग, धुळेचा संसर्ग, अतिसार आणि निमोनिया सारखे रोग होतात.
 
रोग प्रतिकारक शक्ती बळकट करते भरपूर झोप -
झोपेची कमतरता प्रतिकारक शक्तीला बळकट होऊ देत नाही. कोणत्याही सामान्य प्रौढ व्यक्तीला किमान 8 ते 9 तासापर्यंत पुरेशी झोप मिळाली पाहिजे.अशा प्रकारे पौष्टिक आहाराची कमतरता आणि आरामदायक शैली लठ्ठपणा वाढवते.
 
या सह ताण तणाव जास्त असल्यामुळे हार्मोन्स चे असंतुलन झाल्यामुळे शरीरात अनेक आजार उद्भवू लागतात.लठ्ठपणा हार्मोन्सच्या अधिकतेसह धूम्रपान, मद्यपान करण्याची सवय असल्यास लिम्फोसाईट्स मरण पावतात.
 
कोणत्या चुका करू नये-
आपल्या जीवनशैली मध्ये परिवर्तन करा.तणाव कमी करण्यासाठी योगाभ्यास किंवा ध्यान अवलंबवा.  
लठ्ठपणापासून सुटका मिळविण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे पौष्टिक आहार घेणं. पौष्टिक आहारात व्हिटॅमिन्स आणि महत्त्वपूर्ण खनिजे असतात. जे प्रतिकारक शक्तीला योग्यरीत्या कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतात. हिरव्या पालेभाज्या.हंगामी फळे आणि सुकेमेवे आपल्या आहारात समाविष्ट करावे.धूम्रपान आणि मद्यपान करणे सोडा. 
 
काय बदल करावे-
* पुरेशी झोप घेण्यासाठी रात्री 10 वाजताच झोपा.
* डिनर टाइम झोपण्याच्या तीन तासापूर्वी समायोजित करा. 
* दररोज सकाळी किमान 45 मिनिटे घाम निघे पर्यंत पायी चाला.
* तणाव मुक्तीसाठी ध्यान योगसाधनेची मदत घ्या.
 
लठ्ठपणा आनुवंशिक आहे-
ज्या लोकांच्या कुटुंबात रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असण्याचा इतिहास आहे. त्यांना कोणत्याही आजाराला बळी पडण्याचा धोका असतो. याच्या सह सरते वय देखील रोग प्रतिकारक शक्तीला कमकुवत करतात. आहारात पौष्टिक घटकांची कमतरतेमुळे इम्युनोडेफिशिएन्सी डिसऑर्डर होतो.सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोपेनंतर शरीर झोपेच्या दरम्यान प्रथिने तयार करण्यास सुरुवात करतो.जेणे करून कोणत्याही संक्रमणाला सामोरी जाण्यास सज्ज असावे.