शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (17:15 IST)

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी या 5 गोष्टींचे सेवन करा

बदलत्या जीवनशैली खाणं-पिणं आणि तासंतास कॉम्प्युटर वर ऑफिसचे काम करत राहणे किंवा मोबाइलवर गेम खेळणे या सर्व गोष्टी आपल्या दृष्टीला कमकुवत आणि डोळ्यांना अशक्त करीत आहे. डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात नाजूक आणि आवश्यक अंग आहे. म्हणून ह्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांमुळेच आपण जगातील चांगल्या आणि वाईट गोष्टी बघू शकतो. डोळे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे पोषक घटकांचे सेवन करणे.हे पोषक घटक आपले आरोग्य सुधारतात आणि डोळ्यांना खराब होण्यापासून प्रतिबंधित करतात. या साठी आपल्याला आहारात सुकेमेवे जसे की बदाम, अक्रोड, शेंगदाणे,सूर्यफुलाचे बियाणं जास्त प्रमाणात वापरण्यात आणले पाहिजे. कारण या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन इ आढळते. जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.व्हिटॅमिन इ च्या कमतरतेमुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते.
डोळ्याची दृष्टी चांगली आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी या 5 गोष्टींचे सेवन करावं 
 
1 भाज्या- 
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयरन आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळते.जे डोळ्यांची दृष्टी वाढविण्यात आणि डोळ्यांना निरोगी ठेवण्यात मदत करते.
 
2 सुकेमेवे -
सुकेमेवे आणि शेंगदाणे जास्त प्रमाणात घ्यावे.कारण या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन इ आढळते.डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी व्हिटॅमिन इ उपयुक्त मानले जाते. 
 
3 गाजर -
गाजर हे व्हिटॅमिन सी चे चांगले स्रोत मानले जाते.गाजराचे ज्यूस किंवा रस पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. हे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. दररोज एक ग्लास गाजराचे ज्यूस प्यायल्यानं डोळ्याची दृष्टी वाढते.
 
4 सोयाबीन- 
जर आपण मांसाहार खात नाही, तर आपण सोयाबीन खाऊ शकता. सोयाबीन हे पोषक घटकांनी समृद्ध असतात. सोयाबीनचे सेवन डोळ्याची दृष्टी वाढविण्यास मदत करतात. 
 
5 अंडी -
अंडी मध्ये अमिनो ऍसिड, प्रथिन,सल्फर,लॅक्टीन,ल्युटीन,सिस्टीन आणि व्हिटॅमिन बी 2 आढळते. व्हिटॅमिन बी पेशींच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे.अंडींचे सेवन हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असू शकते.