गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (19:10 IST)

Covid-19 : इम्यून सिस्टम बळकट असल्यास व्हायरस हल्ला करू शकत नाही

Covid-19: The virus cannot attack if the immune system is strong health article in marathi corona virus and immune system how to build strong immune system if immune system strong virus cannot attack  corona virus
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याला रोखण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे. या विषाणू पासून आराम मिळण्यासाठी कोणतेही प्रभावी उपचार आढळले नाही. 
 
कोरोना व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी तज्ज्ञ आणि डॉक्टर्स इम्यून सिस्टम वाढविण्याचा सल्ला देत आहे. जेणे करून व्हायरस आपल्यावर अधिराज्य  गाजवू शकत नाही.म्हणजे आपल्या शरीरातच या व्हायरस ला पराभव करण्याची शक्ती आहे.आपल्याला इम्यून सिस्टम  किंवा प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी  आपल्या दिनचर्येत कोणत्या गोष्टींना समाविष्ट करावे आणि कोणत्या गोष्टींना घेणे टाळावे या मुळे आपले  इम्यून सिस्टम कमकुवत होतात. 
 
सर्वप्रथम जाणून घेऊ या की कोणत्या अशा गोष्टी आहे ज्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करतात. 
 
* नियमित योगाभ्यास करा- 
शरीराला आतून बळकट करण्यासाठी नियमानं योगाभ्यास करावे. हे आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवते.  
 
* शारीरिक क्रिया- 
शारीरिक क्रियेकडे लक्ष द्या. शारीरिक क्रियाकलापांमुळे आपण सक्रिय व्हाल आणि आपली रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढेल. या साठी आपण खेळ समाविष्ट करू शकता. जेणे करून शरीराचा व्यायाम होईल आणि मानसिक दृष्टया ताजे वाटेल. 
 
* बाहेरचे खाऊ नका- 
बाहेरचे काही खाऊ नका घरात बनलेले शुद्ध आणि सात्त्विक जेवण घ्या जंक फूड, कोल्ड्रिंक घेणे टाळा, आपल्या खाण्या पिण्याच्या पद्धतीमध्ये बदल करा. आहारात हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करा.हे आपल्या इम्यून सिस्टम ला बळकट करतात आणि अशा प्रकारे आपण व्हायरसला आपल्या पासून दूर ठेवाल. 
 
* व्हिटॅमिनसी चे सेवन करा- 
इम्यून सिस्टम बळकट करण्यासाठी व्हिटॅमिन सी चे सेवन करावे.या साठी आपण आवळ्याचे सेवन करू शकता 
 
* तुळशीचे सेवन -
रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज तुळशीचे सेवन करावे. अनोश्यापोटी देखील आपण तुळशी घेऊ शकता.  
 
कोणत्या गोष्टींमुळे इम्यून सिस्टम कमकुवत होते जाणून घेऊ या. 
मैद्याचे पदार्थ जसे की ब्रेड,नॉन,भटुरे,पिझ्झा इत्यादी. साखर, कोल्ड्रिंक्स,पॅकिंग पदार्थ, जंक फूड या पदार्थाचे सेवन केल्याने हे इम्यून सिस्टम ला कमकुवत करते.  
 
कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी आपल्या आहारात आणि जीवनशैली मध्ये काही बदल केले तर या व्हायरसला आपल्या वर आधिपत्य गाजविण्यापासून रोखले जाऊ शकते. आता वेळ आली आहे बदल करण्याची. या कोरोनाच्या काळात समजूतदारीने उचललेले एक पाऊल आपल्याला निरोगी जीवनाकडे नेईल. म्हणून व्हायरसशी घाबरून जाऊ नका, स्वतःला आतून बळकट करा आणि या विषाणूंचा पराभव करा.