काय सांगता, काकडी मधुमेहासाठी रामबाण आहे
मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो. टाइप 2 मधुमेह बहुतेक प्रत्येक रुग्णांमुळे आढळतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराविषयी काळजी आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहा साठी काकडी फायदेशीर आहे.
* रक्तातील साखरेची पातळी कमी करते-
या मध्ये असलेले घटक गटातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास प्रभावी आहे. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडी फायदेशीर आहे.
* लठ्ठपणा कमी करते -
शरीराचे वजन वाढल्याने रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. अशा परिस्थितीत काकडी शरीराचा लठ्ठपणा कमी करते. या मध्ये कमी कॅलरी आणि पोषक अधिक असतात. म्हणून काकडी खाल्ल्यानं भूक लवकर लागत नाही.
* रोग प्रतिकारक शक्ती वाढवते -
रुग्णांची शक्ती वाढविण्यासाठी काकडी प्रभावी आहे, त्यात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सीडेन्ट असतात जे शरीरात मुक्त रेडिकल्सशी लढण्यासाठी सामर्थ्य देतात, या मुळे जुन्या आजाराचा धोका कमी होतो.
* डोळ्यांची दृष्टी सुधारते.
ज्या लोकांना बऱ्याच काळापासून मधुमेहाचा त्रास आहे. त्यांना दृष्टी संबंधित समस्यांना सामोरी जावे लागते. अशा परिस्थितीत काकडी खाणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. काकडी व्हिटॅमिन ए चे उत्तम स्रोत आहे. जी डोळ्याची दृष्टी वाढविण्यास उपयुक्त आहे.
* इन्स्युलिन ची पातळी चांगली होते-
काकडीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात. जे युरिक ऍसिड नियंत्रित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त या मध्ये प्युरीन नसते. जेव्हा शरीरातील युरिक ऍसिडची पातळी चांगली असेल तेव्हाच शरीरात इन्स्युलिनची पातळी देखील चांगली राहते.
* डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण होणार नाही-
मधुमेह असलेल्या रुग्णांना वारंवार लघवी करण्याची समस्या उद्भवते, या मुळे पाण्याची कमतरता होऊ शकते. जेणे करून त्यांना थोड्या थोड्या वेळाने तहान लागू शकते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतात, या मुळे शरीर हायड्रेट राहते.