मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (18:46 IST)

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. परंतु ह्याचा वापर करताना सावधगिरी बाळगा नाही तर ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. कोरफडचा मर्यादित वापर करणे फायदेशीर आहे. कोरफडचा अति वापर धोकादायक असू शकतो. कोरफडाचा अति वापर धोकादायक कसं असू शकतो जाणून घेऊ या.  
 
कोरफडाचे अतिसेवन केल्याने पोटाशी निगडित त्रास होऊ शकतात. म्हणून हे मर्यादित प्रमाणात वापरावे. कोरफड हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. परंतु त्वचेवर कोरफडाचा अधिक वापर देखील त्वचेची समस्या उद्भवू शकतात. कोरफड चेहऱ्यावर अधिक प्रमाणात लावल्याने चेहरा रुक्ष आणि कोरडा होऊन बारीक पुरळ येऊ शकतात.
मधुमेहाच्या रुग्णांना कोरफडाचा रस घेणं चांगले नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्याचे सेवन करू नये. कोरफडाचे अधिक सेवन केल्याने लिव्हरचा त्रास उद्भवू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर कोरफड घेणे अधिक चांगले आहे.