बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

Restaurant Style Manchurian Recipe घरीच बनवा अगदी रेस्टॉरंट स्टाईल चविष्ट मंचूरियन

Manchurian
साहित्य- 
मंचूरियन बॉल्ससाठी 
कोबी बारीक चिरलेली-२ कप
गाजर किसलेले- १ कप
फ्रेंच बीन्स - १/२ कप
हिरवा मिरची बारीक चिरलेली-२ 
आले-लसूण पेस्ट - १ मोठा चमचा
कॉर्नफ्लोअर- ४-५ मोठे चमचे
मैदा-२ मोठे चमचे
सोया सॉस-१ छोटा चमचा
मीठ चवीनुसार
मिरी पूड-१/२ छोटा चमचा
तेल  
 
ग्रेव्हीसाठी-
तेल -२ मोठे चमचे
लसूण बारीक चिरलेली-५-६ पाकळ्या
आले बारीक चिरलेले 
हिरवी मिरची तिरकी काप-२ 
कांदा चौकोनी काप- १ मोठा
कॅप्सिकम -१ मोठा
सोया सॉस-२ मोठे चमचे
टोमॅटो केचप- २ मोठे चमचे
चिली सॉस -१-२ मोठे चमचे 
व्हिनेगर- १ छोटा चमचा
कॉर्नफ्लोअर- १ मोठा चमचा 
मीठ 
मिरी पूड
साखर  
पाणी- २ कप 
कांद्याची पात 
 
कृती-
सर्वात आधी कोबी, गाजर, बीन्स चांगले स्वच्छ धुवून पाणी काढून घ्या. सर्व भाज्या, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, मीठ, मिरी, कॉर्नफ्लोअर आणि मैदा एकत्र करून घट्ट सरस पीठ मळून घ्या  व छोटे-छोटे गोल तयार करा. आता कढईत तेल चांगले तापवा. मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बॉल्स तळून घ्या. कागदावर काढून ठेवा. आता कढईत २ चमचे तेल तापवा. लसूण-आले-मिरची ३० सेकंद परतून घ्या. कांदा आणि कॅप्सिकम टाका, १-२ मिनिटे हाय फ्लेमवर परतून घ्या. आता सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, व्हिनेगर, थोडे मीठ-मिरी-साखर टाका. तळलेले बॉल्स टाका आणि चांगले मिक्स करा. कांद्याची पात टाकून गॅस बंद करा.
 
ग्रेव्ही मंचूरियन-   
वरील स्टेप ३ पर्यंत सारखेच करा.
सॉस टाकल्यानंतर २ कप पाणी टाका, उकळी येऊ द्या.
कॉर्नफ्लोअर व पाण्याचे मिश्रण हळूहळू टाका आणि सतत ढवळत राहा. आता २-३ मिनिटे उकळून घट्ट सरस ग्रेव्ही करा. शेवटी तळलेले बॉल्स टाका, १-२ मिनिटे शिजू द्या. व कांद्याची पात टाकून सर्व्ह करा.
टिप्स-
जास्त कुरकुरीत हवे असल्यास बॉल्स डबल फ्राय करा 
ग्रेव्ही खूप घट्ट/पातळ झाली तर पाणी किंवा कॉर्नफ्लोअर मिश्रण समजून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik