रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (09:40 IST)

काय सांगता, वेगवेगळ्या भांड्यात जेवल्याने अनेक फायदे आहे

आपण हे ऐकले असणार की तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर आहे. परंतु हे माहीत आहे का इतर भांडी देखील आहे ज्यांचा वापर केल्याने आपल्या आरोग्यास फायदा मिळतो चला तर मग जाणून घेऊ या.  
 
* कांस्याची भांडी - 
कांस्याच्या भांड्यात जेवल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे.या मुळे मेंदू तीक्ष्ण होतो. रक्तविकारात सुधारणा होते. भूक देखील लागते. परंतु लक्षात ठेवा की कांस्याच्या भांड्यात आंबट काही घेणं टाळावे. 
 
* अल्युमिनियम ची भांडी-
आयुर्वेदानुसार या भांडीत जेवण करू नये. या मुळे हळू-हळू हाडे कमकुवत होतात आणि पचन तंत्रावर देखील प्रतिकूल परिणाम होतो.  
म्हणून या भांडीत जेवू नये. 
 
* लोखंडी आणि स्टीलची भांडी -
प्रत्येकाला हे माहीत आहे की लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने आणि खाल्ल्याने आयरन ची कमतरता दूर केली जाऊ शकते. या मध्ये तयार अन्न खाल्ल्याने ऊर्जेची पातळी व्यवस्थित राहते. तथापि, मासे, अम्लीय अन्न,लोखंडी भांड्यात शिजवू नये. अशा प्रकारे स्टीलने बनलेल्या भांडीत देखील जेवल्याने शरीराला कोणतीही हानी होत नाही. 
 
* तांब्याची भांडी -
या भांडीत सकाळी उठून पाणी प्यायल्याने आरोग्यास फायदे होतात. या मुळे पोटाचे विकार जसे की गॅस ची समस्या होणं दूर केले जाऊ शकते. या भांड्यातून पाणी प्यायल्याने स्मरण शक्ती वाढते आणि लिव्हरचे त्रास दूर होतात. बरेच लोक पाण्यात तुळशीची पाने घालून देखील पाणी पितात. 
 
* मातीची भांडी- 
सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे. मातीने तयार केलेले भांडी. असं म्हणतात की या मध्ये अन्न शिजवल्यावर आणि खाल्ल्यावर शरीराला काहीच नुकसान होत नाही. शहरात ह्याचा वापर कमी प्रमाणात आढळतो. परंतु गावात आज देखील ह्या भांडीचा वापर सर्रास करतात. या मध्ये अन्न शिजायला वेळ लागते परंतु अन्न पौष्टिक असते.
 
* सोनं आणि चांदीची भांडी-  
मौल्यवान असल्यामुळे हे कमी वापरतात. असं म्हणतात की सोन्याच्या भांड्यात जेवण केल्याने शरीर बळकट आणि दृढ होत. चांदीच्या भांड्यात जेवल्याने शरीराला थंडावा मिळतो. मेंदू तीक्ष्ण होतो. 
 
* पितळी भांडी -
पितळी भांड्यात देखील जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले आहेत.