मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (16:29 IST)

‘इंद्रायणी एफसी’ ठरला राजवाडा फुटबॉल चषकाचा मानकरी

जत जि. सांगली येथील राजवाडा फुटबॉल क्लबच्यावतीने आयोजित राष्ट्रीय राजवाडा फुटबॉल चषक स्पर्धेत देहूरोड येथील इंद्रायणी एफसी संघाने पंढरपूर एफसीचा दणदणीत पराभव करीत विजेतेपद पटकावले. जत येथे नुकतीच राष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा पार पडली. देशभरातून एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामना देहूरोड येथील इंद्रायणी एफसी आणि पंढरपूर येथील पंढरपूर एफसी या संघांमध्ये झाला.यात इंद्रायणी एफसीने तीन गोल करीत एकतर्फी विजय मिळवला. पंढरपूर एफसीला एकही गोल करता आला नाही.
 
या अंतिम सामन्यात तीन गोल करुन इंद्रायणी संघाला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या राजेंद्र बहादूर या खेळाडूला ‘मॅन ऑफ द टुर्नामेंट’ या किताबाने गौरविण्यात आले. प्रशिक्षक आलोक शर्मा यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली इंद्रायणी एफसी संघाने हा दणदणीत विजय मिळविला.