सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रोम , मंगळवार, 9 मार्च 2021 (14:28 IST)

सुवर्णपदकासह पहिलस्थानावर बजरंग पुनियाचा कब्जा

टोक्यो ऑलिम्पिकच्या तया‍रीत असलेला भारतीय पैलवान बजरंग पुनियाने अखेरच्या 30 सेकंदात 2 गुण घेत माटियो पेलिकोन रँकिंग कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत आपल्या खिताबाचा बचाव केला. याबरोबरच त्याने आपल्या वजनी गटात पुन्हा एकदा अव्वलस्थानही काबीज केले.
 
मंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओचिरविरूध्द 65 किलो वजनी गटाच अंतिम सामन्यात बजरंग अंतिम क्षणापर्यंत 0-2 ने पिछाडीवर होता. मात्र, अखेरच्या 30 सेकंदात त्याने 2 गुण घेत स्कोर बरोबरीत आणला. रविवारी झालेल्या सामन्यात बजरंगने अंतिम गुण घेतला होता व याआधारे त्याला विजयी घोषित करण्यात आले. बजरंग या स्पर्धेपूर्वी आपल्याच वजनी गटात क्रमवारीत दुसर्या स्थानी होता. मात्र, येथे त्याने 14 गुण प्राप्त केल्याने तो अव्वलस्थानी पोहोचला आहे. ताजी क्रमवारी केवळ या टुर्नामेंटच्या निकालावर आधारीत आहे. त्यामुळे सुवर्णपदक जिंकणारा हा पैलवान अव्वल क्रमांक प्राप्त करत आहे.