शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (13:42 IST)

प्रतापगड किल्ला

Pratapgad Fort
प्रतापगडाचा किल्ला पश्चिमी भारताच्या महाराष्ट्रच्या साताऱ्या राज्यातील एक मोठा किल्ला आहे. प्रतापगडाच्या लढाईचे स्थळ म्हणून असलेला हा महत्त्वाचा किल्ला आता एक पर्यटनस्थळ म्हणून आहे. प्रतापगड हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शक्तिशाली अफजलखानाच्या चकमकीसाठी प्रसिद्ध आहे.    
 
वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली.

प्रतापगडाला कसं जावं- 
जवळ चे ठिकाण महाबळेश्वर ला जाऊन  खाजगी वाहनाने जाता येते.
 
प्रेक्षणीय स्थळे- 
वाहन तळावरून गडाच्या दक्षिणेस टेहळणी बुरुजावरून सरळ पायवाट जाते. जी महादरवाजा ला येऊन पोहोचते. इथून पुढे गेल्यावर चिलखती बांधणीचा बुरूज आहे तिथून पुढे गेल्यावर भवानी माता मंदिर आहे इथे देवीची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. या मूर्ती शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग आणि सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते ह्यांची तलवार आहे.
समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती, केदारेश्वर मंदिर, सदर, राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा,दिंडी दरवाजा, रेडका बुरूज, यशवंत बुरूज,सुर्यबुरुज, भवानी  मंदिरात सभामंडप आणि नगारखाना आहे.