बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (22:31 IST)

बापरे ! ओडिशाच्या सोनपुरात लग्नाचा आनंद शोकात बदलला

ओडिशाच्या सोनपुरात एक अतिशय वेदनादायक अपघात झाला. लग्नाची संधी होती पण बघता बघता ही आनंदाची वेळ शोकमय वातावरणात पसरली .लग्नात विदाई किंवा सासरी जाताना प्रत्येक मुलीला स्वतःचे घर सोडून जाताना वाईट वाटते आणि आपसूकच तिचे डोळे पाणावतात. या लग्नघरात वधू सासरी जाताना इतकी रडली की तिला हृदय विकाराचा झटका आला आणि ती जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या नंतर लग्न घरात रडण्याच्या आवाजच ऐकू येऊ लागला. 
मीडिया रिपोर्टनुसार, ओडिशाच्या सोनापूर जिल्ह्यात जूलांडा गावातील मुरली साहू यांचा मुलीचे रोजी चे लग्न होतें. रोजी साहू हिचे लग्न बलानगीर जिल्ह्यातील तेतलंगावातील राहणाऱ्या बीसीकेसन साहू ह्याच्याशी ठरले होतें. गुरुवारी रात्री वरात आली आणि दोघांचे लग्न थाटामाटाने झाले. सकाळी वधूच्या विदाईच्या वेळी सासरी जाताना आनंदाचे वातावरण शोकात बदलले. 
रोजी साहू ही सासरी जाताना आपल्या कुटुंबाला सोडून जाताना खूपच भावनिक झाली आणि जोरजोराने रडू लागली. ती इतकी रडली की रडता रडता बेशुद्ध झाली .यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिच्या तोंडावर पाणी घातले आणि तिला जागे करण्याचा प्रयत्न करू लागले. काहींनी तिचे हात पाय देखील चोळले. 
तरीही ती शुद्धीवर आली नाही आणि तिला नजीकच्या डांगुरीपाली सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. आरोग्य केंद्रात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की वधूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हे ऐकताच लग्न घरातील आनंद शोकात बदलला.   
या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी पाठविले. या नंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. रोजी च्या मृत्यूची बातमी साऱ्या खेड्यात पसरतातच खेड्यातील लोक बरेच आश्चर्यचकित झाले. लोकांनी सांगितले की काही महिन्यापूर्वीच रोजीच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता. या नंतर रोजी खूपच दुखी राहत होती. 
गावाच्या लोकांनी सांगितले की रोजीचे लग्न तिच्या मामाने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी लावले होतें. रोजी साहू च्या मृत्यू नंतर गावात शोककळा पसरली आहे.