मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (10:39 IST)

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार

mother father having equal rights on son income
नवी दिल्ली- पोटगीप्रकरणी न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय देत म्हटले की की कोणत्याही व्यक्तीच्या कमाईवर केवळ त्याच्या पत्नी आणि मुलांचा अधिकार नसून वृद्ध आई- वडिलांचाही समान अधिकार असतो. पालक त्याच्या कमाईमध्ये समान भागीदार असतात. 
 
तीस हजारी स्थित प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश कठपलिया यांच्या कोर्टाने एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. 
 
काय होते प्रकरण
एका महिलेने आपल्या पतीची कमाई दर महिना 50 हजारापेक्षा जास्त असून तिला आणि तिच्या मुलांना केवळ 10 हजार रुपये पोटगी दिली जात असल्याचे म्हटले होते. मात्र, पतीनं त्याची महिन्याची कमाई 37 हजार रुपये असून त्यातून स्वतःचा पत्नी आणि दोन मुलांचा खर्च उचलावा लागतो. शिवाय आपल्या आई वडिलांचाही सांभाळ करावा लागत असल्याचं म्हटलं.
 
तथ्य तापसणीत त्यांच्या आयकर खात्यानुसार त्यांचे मासिक उत्पन्न केवळ 37 हजार रुपये आहे. रिपोर्टप्रमाणे आई वडिलांच्या सांभाळ व त्यांच्या आजारपणाचा खर्चगी तोच करतो. मात्र, पत्नीचं म्हणणं होतं की तिच्या पतीचं अधिक कर्तव्य आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणे आहे म्हणून तिची पोटगी वाढवावी.
 
न्यायालयानं याप्रकरणी निकाल देताना पतीच्या पगाराचे सहा भाग केले. यातील दोन भाग त्याचे स्वतःचे, पत्नीची आणि मुलांचा प्रत्येकी एक एक तर आई वडिलांनाही प्रत्येकी एक असे भाग करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयानं म्हटलं त्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला आपल्या पत्नी आणि मुलांना 12 हजार 500 रुपये द्यावे लागतील.