शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (21:21 IST)

शाळांच्या फी प्रश्नावर मुंबई हायकोर्टात अंतिम निर्णय सोमवारी दुपारी

मागील काही दिवसांपासून शाळांच्या फीवरून पालक आणि शाळा यांच्यात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना काळात अनेक कुटुंबांची आर्थिक गणिते कोलमडली. त्यातच शाळांनी मागील वर्षी फीवाढीचा निर्णय घेतला. तसेच फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळांनी कारवाई केल्याचेही पाहायला मिळाले. मात्र, फी भरली नाही तरी विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये असे मुंबई हायकोर्टाने आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकांना थोडा दिलासा मिळाला आहे. शाळांच्या फी प्रश्नावर मुंबई हायकोर्ट शुक्रवारी अंतिम निर्णय देणार होते. मात्र, अंतिम निर्णय सोमवारी दुपारी देणार असल्याचे आता मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले.
 
आमचा प्रारूप आदेश तयार आहे. मात्र, या प्रश्नावर दोन्ही बाजूंची सहमती असलेल्या मुद्द्यांच्या आधारे आदेश होणे आवश्यक असल्याने सोमवारी असे मुद्दे मांडावेत, त्यानंतर आम्ही आदेश काढू, असे मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि याचिकादार शिक्षण संस्थांना सांगितले.