मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (17:05 IST)

चित्रा वाघ यांची पूजा चव्हाण प्रकरणी सरकारवर जबरी टीका

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणी सरकारवर जबरी टीका केलीय ''ठाकरे सरकारमध्ये मंत्री वाचला पाहिजे राज्यातील गोर गरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील'' अशा तीव्र शब्दात टीकेची झोड उठवली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास असल्याचंही मत मांडलय.    
 
सॅमसंग गॅलक्झी एस10 लाईट ग्रे कलरचा फोन आहे, या फोनच्या डिस्प्लेवर 45 कॉल हे संजय राठोडचे दिसत आहेत. ज्या दिवशी पूजा चव्हाणची आत्महत्या झाली, त्याचदिवशी हे 45 मिस कॉल्स आले होते, याचं स्पष्टीकरण पोलीस देणार आहेत का, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी  विचारला. मग, हा संजय राठोड कोण आहे, हेही पोलिसांनी सांगाव. पुणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पोलीस महासंचालकांनी हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन, एका सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, अशी मागणीही चित्राव वाघ यांनी केलीय. मंत्रिमंडळातील सगळे मंत्री एकच आहेत, पण केवळ मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे. कारण, हा केवळ एका पूजा चव्हाण आणि संजय राठोडचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील सगळ्या मुली अन् महिलांचा आहे, असेही वाघ यांनी म्हटलंय.