1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (21:17 IST)

पुजा चव्हाण प्रकरण, पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांचा पोलिसात तक्रार अर्ज

In the case of Puja Chavan Pune पुजा चव्हाण प्रकरण
पुजा चव्हाण प्रकरणात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या सून आणि पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी दिली पोलिसात तक्रार दिली आहे.
 
संजय राठोड याच्यावर कलम 306, 107 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसांकडे केली. या प्रकरणात ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्यातून संजय राठोड यांचे संबंध पुजा चव्हाणशी होते हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून किंवा प्रेमभंगातून किंवा संजय राठोड यांच्याकडून होणाऱ्या दबावाला कंटाळून पुजा चव्हाण हिने आत्महत्या केली असे स्वरदा बापट यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वरदा बापट यांनी केली.