भोसरी जमीन प्रकरण, राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा

Last Modified बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (20:58 IST)
भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. बुधवारी
सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा मिळाला आहे.

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली होती. या प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. 8 मार्चपर्यंत हायकोर्टाकडून खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे.
भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर 30 डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर राहायचे होते. ते ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु, कोरोनाची लागण झाल्यानंतर अखेरीस 15 जानेवारीला ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.

काय आहे भोसरी जमीन खरेदी प्रकरण ?
-भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद

– ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष

– चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली

– तीन कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी

– पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद

– स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले
– पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं

– रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोपयावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

इंदू मिलमधल्या आंबेडकर स्मारकाचं काम वेळेत पूर्ण करा - ...

इंदू मिलमधल्या आंबेडकर स्मारकाचं काम वेळेत पूर्ण करा - धनंजय मुंडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाचं काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण करावं ...

कोरोना लशीमुळे शरीर चुंबक झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही- ...

कोरोना लशीमुळे शरीर चुंबक झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही- डॉक्टरांनी केलं स्पष्ट
प्रवीण ठाकरे कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व आलं असा दावा नाशिकच्या एका ज्येष्ठ ...

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट
हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या कोव्हिड ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - रामराजे निंबाळकर
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळालं असलं तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ...

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण
पुणे शहरासह जिलह्यामध्ये गेल्या पाच महिन्यांत 42 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय.