मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:15 IST)

महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून लवकरच क्षेत्रीय कार्यालयाची एकत्रित विभागणी करुन तीन परिमंडल स्थापन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून लवकरच क्षेत्रीय कार्यालयाची एकत्रित विभागणी करुन तीन परिमंडल स्थापन करण्यात येणार आहेत. प्रशासनाचा गतीमान व पारदर्शक कारभार करण्यासाठी ही विभागणी करुन उपायुक्तांच्या माध्यमातून कारभार हाकण्यात येणार आहे. याबाबत प्रशासन विभागाकडून प्रस्ताव तयार केला केला असून विधी समितीसह महासभेपुढे ठेवून मान्यता घेण्यात येणार आहे.
 
महापालिकेच्या प्रशासन विभागाने प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणि सुसूत्रतता आणण्यासाठी हे परिमंडल तयार करण्यात येत आहे. महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयांची विभागणी प्रत्येकी तीन-तीन क्षेत्रीय कार्यालयाचे दोन परिमंडल आणि दोन क्षेत्रीय कार्यालयाचे एक परिमंडल यानूसार भौगोलिक रचनेनूसार विभागणी केली जात आहे. या तीन परिमंडलाची जबाबदारी उपायुक्तांना देवून आर्थिक व प्रशासकीय पातळीवर अधिकार प्रदान केले जाणार आहेत. त्याशिवाय महापालिकेच्या प्रत्येक विभागाची विभागणी करुन ते अधिकार उपायुक्तांना दिले जाणार आहे. त्यामुळे परिमंडल स्तरावरच त्या-त्या प्रभागातील अडीअडचणी, समस्या सोडवून नागरिकांना सुलक्ष सेवा-सुविधा दिल्या जाणार आहे.