गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (21:09 IST)

भाजप महापाैरांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल, ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैंदर्य स्पर्धा आयोजकांच्या आली अंगलट

कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असतानाही साैंदर्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जवाहर मनोहर ढोरे (रा. नवी सांगवी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव मारुती शिंदे (वय ५४, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. जवाहर ढोरे हा महापाैर उषा ढोरे यांचा मुलगा आहे.
 
कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लादले. मात्र, हे सर्व नियम पायदळी तुडवत ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैंदर्य स्पर्धा चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृह भरविण्यात आल्या. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणा-या जवाहर मनोहर ढोरे (मल्हार गार्डन, नवी सांगवी) यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. सार्वजनिक कार्यक्रमांना कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात येवू लागली. मात्र, चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैदर्य स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमांसाठी दोनशे जणांची परवानगी दिली होती. तसेच एक आड एक अशी आसन व्यवस्था करावी, मास्क अनिवार्य करण्यात आला. मात्र, कार्यक्रमात सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रा. मोरे सभागृहात संपुर्ण आसन व्यवस्था फुल्लच झाली होती. काहींनी मास्क लावला नसल्याचे आढळून आले.