1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (13:36 IST)

'मन्नत'च्या नेमप्लेटमवर हिरे जडलेले आहेत का? गौरी खानने दिली याबद्दल माहिती

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याचा बंगला 'मन्नत' देखील. 'मन्नत'च्या बाहेर चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. चाहते मन्नतच्या बाहेरील नेम प्लेट जवळ फोटो क्लिक करायला विसरत नाही. अलीकडेच शाहरुखच्या बंगल्यावर नवीन नेम प्लेट लावण्यात आली आहे.
 
'मन्नत'च्या बाहेरील ही नवीन नेम प्लेट रात्रीच्या अंधारात चमकते. या नेमप्लेटमध्ये हिरे जडल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी गौरी खानने तिच्या बंगल्याची ही नेम प्लेट रात्रीच्या अंधारातही का चमकते याचा खुलासा केला आहे. गौरी खानने ही नेम प्लेट डिझाइन केली आहे.
 
गौरी खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती 'मन्नत'च्या बाहेर नेमप्लेटजवळ उभी आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी प्रवेशद्वार आहे.
 
तिने लिहिले की त्यामुळे नावाची पाटी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. सकारात्मक, मूड चांगला ठेवणारी आणि शांत वातावरण तयार करण्यासाठी आम्ही ग्लास क्रिस्टलसह पारदर्शक सामग्री निवडली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

गौरी खानने 'मन्नत'च्या नेम प्लेटमध्ये कोणताही हिरा नसल्याचे स्पष्ट केले आहे. 'मन्नत'च्या प्रवेशद्वारावरील या नेमप्लेटला एलईडी लाईट्ससह 'डायमंड' लूक देण्यात आला आहे. काळ्या ठळक अक्षरात 'मन्नत' लिहिलेली ही नेमप्लेट रात्रीही चमकते.

Edited by: Rupali Barve