सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

9 महिन्यांनंतर अर्जुन कपूरने हटवली टोपी, गर्लफ्रेंड मलायका अरोराने केलं कमेंट

अर्जुन कपूरने आपल्या अपकमिंग 'पानीपत' चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी अर्जुन कपूर बाल्ड देखील झाले, ज्यामुळे त्याने मागील 9 महिन्यांपासून कॅप घातलेली होती. आता अर्जुनने आपली कॅप हटवली आहे.
 
अर्जुनने सोशल मीडियावर आपल्या डोक्यावरून कॅप हटवतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओ पोस्ट करत अर्जुन कपूरने लिहिले, '9 महिन्यांनंतर... बाल-बाल बच गए।'
 
अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा देखील त्याला कॅपशिवाय बघून खूश झाली आहे. मलायकाने अर्जुनच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, Hmmmmm.
 
या पूर्वी अर्जुनने एका पोस्टमध्ये लिहिले होते, 16 नोव्हेंबर, 2018 रोजी आपले केस काढवले होते पानीपत साठी. आता जुलैला शेवट आहे. चित्रपटाचे काम पूर्ण झाले आहे आणि आता मी आपली कॅप हटवू शकतो. दुर्भाग्याने आता मला माझ्या त्या सर्व टोप्या सोडाव्या लागतील ज्या मी मागील 7-8 महिन्यात निवडल्या होत्या. कॅप घालून खूप मजा आला. चित्रपटातची शूटिंग पूर्ण झाली आहे.
आशुतोष गोवारिकरच्या दिग्दर्शनाखाली तयार पानीपत या चित्रपटात अर्जुन, आतापर्यंतच्या सर्वात कठिण भूमिकेत दिसणार आहे. अर्जुनने वॉरियरच्या भूमिकेसाठी न केवळ केस काढवले होते बलकी आपल्या फिजीकवर देखील खूप काम केले.