शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (14:48 IST)

अर्जुन कपूरने जान्हवी कपूरची माफी मागितली

बोनी कपूर आणि त्यांची पहिली बायको मोना कपूरचा मुलगा आहे अर्जुन कपूर, जेव्हा की बोनी आणि त्यांची दुसरी बायकोची मुलगी आहे जान्हवी कपूर. अर्जुन कपूरने श्रीदेवी आणि तिच्या मुलींपासून नेहमीच दुरावा बनवून ठेवला, पण श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन, श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी कपूरसोबत दिसत आहे आणि त्यांची काळजी देखील घेतो.
 
जान्हवी कपूरचे पहिले चित्रपट 'धडक' जुलैमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर 11 जूनला प्रसिद्ध करण्यात येत आहे. या खास प्रसंगी अर्जुन ने एक ट्विट केले आहे.
 
अर्जुन ने लिहिले आहे की जान्हवी आता तू प्रेक्षक आणि फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग बनणार आहे. कारण तुझ्या चित्रपटाचे ट्रेलर लाँच होणार आहे. मी तुझी माफी मागतो की मी या वेळेस मुंबईत नाही आहे, पण काळजी करू नको मी नेहमी तुझ्या सोबत आहे.
 
मला तुला एक सांगायचे आहे की हा प्रोफेशन गजबचा आहे. तुला इमानदार राहत फार श्रम करावे लागणार आहे. चुकांमुळे शिकावे लागणार आहे. सर्वांनी दिलेला सल्ला ऐकावा लागेल. हे सोपे नाही आहे पण मला विश्वास आहे की तू नक्की हे करशील. धडकसाठी शुभेच्छा.