1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Asha Bhosale's own YouTube channel

आशा भोसले यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल

प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी यूट्यूबवर एंट्री घेतली आहे. त्यांच्या नातीने त्यांना स्वतःचं यूट्यूब चॅनेल उघडण्यास प्रोत्साहित केलं, असं आशा भोसले यांनी सांगितलं. या संदर्भात त्या म्हणतात, “सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीप्रमाणे मीही घरात बंदिस्त आहे. घरी माझ्या नातवंडांबरोबर बसून इंटरनेटच्या जगात संवाद स्थापित करण्यासाठी त्यांची सर्व कौशल्ये पाहता, माझ्यासमोर एक नवीन जग उघडकीस आलं. ”
 
ज्येष्ठ गायिका पुढे म्हणतात, “अनेक वर्षांपासून लोकांनी मला माझे विचार, अनुभव आणि भावना सांगायला सांगितले, परंतु या सर्वांसाठी मला वेळ मिळाला नाही. आता मी घरी असताना, मी माझे ८६ वर्षांचे अनुभव सामायिक करण्याचं ठरवलं आहे. कदाचित त्या काही लोकांचे मनोरंजन करतील. ” अस त्याया सांगतात. 
पुढील लेख
‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला