शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (12:13 IST)

अथिया शेट्टी - केएल राहुल या दिवशी सात फेरे घेणार, सुनील शेट्टीने शेअर केली लग्नाची बातमी

गेल्या काही महिन्यांपासून अथिया शेट्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. लोकप्रिय स्टार सुनील शेट्टीची मुलगी भारतीय क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. हे दोघे बरेच दिवस एकत्र आहेत आणि आता ते त्यांच्या नात्याला पुढच्या स्तरावर नेण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. याआधी असे सांगण्यात आले होते की राहुल आणि अथिया या वर्षाच्या अखेरीस लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत, परंतु आता सुनील शेट्टीने मुलीच्या लग्नाबाबत माहिती दिली आहे.
 
सुनील शेट्टीला नुकतेच केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. ज्यानंतर त्यांनी लवकरच लग्न होणार असल्याची पुष्टी केली आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना अभिनेत्याने खुलासा केला की ते तारखांवर विचार करत आहे कारण त्यांना अथिया आणि राहुल दोघांचे शेड्यूल लक्षात ठेवावे लागेल आणि त्यानंतर नियोजन करावे लागेल. आशा आहे की लग्न केव्हा आणि कुठे होणार हे लवकरच कळेल.
 
अथिया आणि राहुल तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत आहेत आणि सुमारे एक वर्षापूर्वी त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. गेल्या वर्षी केएल राहुल शेट्टी कुटुंबासह अहान शेट्टीचा पहिला चित्रपट 'तडप'च्या स्क्रीनिंगला पोहोचला होता. दोघांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. अथिया शेट्टीने 2015 मध्ये हिरो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.