बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (12:06 IST)

युवा आयकॉन आयुष्मान खुराना आणि युनिसेफ भारताच्या पॅरालिंपिक टीमच्या समर्थनासाठी पुढे आले!

प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक आयुष्मान खुराना यांनी त्यांच्या प्रभावाचा वापर समाजासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी पुन्हा एकदा केला आहे.
 
समाजातील समस्यांना हिरीरीने मांडणारे आणि लोकांशी जोडणारे आयुष्मान खुराना आता भारताच्या पॅरालिंपिक टीमच्या समर्थनासाठी पुढाकार घेत आहेत. ही टीम आजपासून पॅरिसमध्ये होणाऱ्या 2024  ग्रीष्मकालीन  पॅरालिंपिक्ससाठी रवाना होत आहे.
 
युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय दूत आयुष्मान खुराना यांनी युनिसेफच्या सहकार्याने भारतीय पॅरालिंपिक टीमच्या अचाट धैर्य आणि प्रबल निर्धाराचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. आयुष्मान यांनी प्रत्येक नागरिकाला आवाहन केले आहे की हे प्रेरणादायी खेळाडू, जे त्यांच्या धैर्याने आणि संकल्पाने संपूर्ण देशाला प्रेरणा देत आहेत, त्यांच्या समर्थनासाठी पुढे येऊन त्यांचा उत्सव साजरा करूया.
 
आयुष्मान खुराना म्हणाला, “आपल्या पॅरालिंपिक चॅम्पियन्सची अचाट धैर्य आणि जिद्द प्रत्येकासाठी एक जिवंत उदाहरण आहे की, कोणतीही आव्हानं आपल्या स्वप्नांच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाहीत. हे खेळाडू प्रत्येक मुलासाठी, विशेषत: दिव्यांग मुलांसाठी प्रेरणादायक आहेत, ज्यांना हे सांगतात की कोणतंही आव्हान अजेय नाही.”
 
तो पुढे म्हणतो, “युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय दूत म्हणून, मी याला समर्थन देतो की सर्व मुलांना, त्यांच्या लिंग, आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी काहीही असली तरी, समावेशक आणि न्याय्य वातावरण मिळावे, जेणेकरून त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकसित होण्यासाठी संधी मिळेल. चला, आपण सर्व मिळून आपल्या पॅरालिंपिक चॅम्पियन्सचे उत्साहवर्धन करूया, जेणेकरून ते अडथळ्यांना पार करून इतिहास घडवू शकतील.”