सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :मुंबई , रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (19:29 IST)

'बाहुबली' स्टार प्रभासचा 'सालार' च्या सेटवर अपघात

'बाहुबली'च्या   (Bhaubali)यशानंतर प्रभास (Prabhas)देशातच नव्हे जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याचा जगभरात जबरदस्त चाहतावर्ग आहे. या यशानंतर प्रभास सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आह पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासचा त्याच्या आगामी 'सालार' या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. त्यामुळे अभिनेत्यावर बार्सिलोना, स्पेनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो एका चित्रपटासाठी 150 कोटी इतकं मानधन घेतो.  
 
प्रभासवर ही छोटीशी शस्त्रक्रिया झाली असली तरी पुढील टेस्ट होईपर्यंत डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. नुकतंच झालेल्या शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी त्याला काही दिवस बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. जगप्रसिद्ध अभिनेत्याच्या शस्त्रक्रियेची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आणि सोशल मीडियावर त्याच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.