गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (10:10 IST)

संजय दत्त अभिनित 'तोरबाज' चित्रपट दिग्दर्शकाच्या मुलाचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

संजय दत्तच्या 'तोरबाज' चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या घरी भीषण अपघात झाला असून, होळीच्या दिवशी गिरीश यांचा मुलगा मनन याचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. मनननेच इमारतीवरून उडी मारली की त्यामागे षडयंत्र आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ज्या इमारतीवरून मननचा मृत्यू झाला त्या इमारतीचे नाव ओबेरॉय स्प्रिंग्स आहे. 
मनन या इमारतीच्या ए-विंगमध्ये राहत होता. वृत्तानुसार, मनन होळी खेळायला गेला होता आणि दुपारी घरी परतला. पाचव्या मजल्यावरून पडल्यानंतर मननला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले मात्र मनंनला  वाचविण्यात यश आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी झाला.