शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (15:36 IST)

साऊथच्या सिनेमात शिवरायांना मानवंदना

RRR
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट RRR येत्या 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. राजामौली यांनी यावेळी केवळ चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवरच नाही तर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मार्फत भारताचा प्रेरणादायी इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
रामचरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांच्यासोबतच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात रामचरणने स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ची भूमिका साकारली आहे. तर, ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘शोले’ हे गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्यात या तिन्ही कलाकारांनी देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांना मानवंदना दिली आहे. ‘वीर मराठा शोले’ असं म्हणत रामचरण आणि ज्युनियर एनटीआरने छत्रपती शिवाजी महाराजांचाही जयजयकार केला आहे.
 
‘आरआरआर सेलिब्रेशन अँथम’ असं नाव या गाण्याला दिलं आहे. राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण ही तिन्ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील खूप मोठी नावं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला 24 तासांच्या आत युट्यूबवर 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.