गुरूवार, 22 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘बाबुमोशाय बंदूकबाज’ चा ट्रेलर रिलीज

babumoshai

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘बाबुमोशाय बंदूकबाज’मध्ये नवाजुद्दीन कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या डायलॉगवरुन अंदाज येतो की यात मारधाड, हाणामारी पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये नवाजुद्दीनचा देशी रोमँटिक स्टाईलही उत्कृष्ट आहे. तर अभिनेत्री दिव्या दत्ताची एन्ट्री चित्रपटातील नव्या ट्विस्टकडे इशारा करते. कुशन नंदी हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. सिनेमात दिव्या दत्ताशिवाय बंगाली अभिनेत्री बिदिता बेगही प्रमुख भूमिकेत आहे.