शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आलिया- वरूणने ‍रिक्रिएट केले तम्मा तम्मा

थानेदार या चित्रपटात संजय दत्त आणि माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या 'तम्मा तम्मा लोगे' या गाण्याची 1990 मध्ये तरूणांत मोठी क्रेझ होती. हे गाणे वरूण धवन आणि आलिया भट्ट यांच्या आगामी बद्रिनाथ की दुल्हनिया चित्रपटात रिक्रिएट करण्यात आले आहे. 
 
हा व्हिडिओ माधुरी दीक्षित यांना दोघांनी दाखवला. यावर धकधक गर्ल प्रचंड खूश झाली आहे. सूत्रांप्रमाणे आलिया आणि वरूण हे गाणे संजय दत्तलाही दाखवणार असून सध्या संजय मुबंईच्या बाहेर आहे. ही जोडी तो परतताच भेटीला जाणार आहे.
 
वरूणला माधुरी आणि संजय बाबतीत विशेष प्रेम आहे. दोघांनी डेव्हिड धवनच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. संजयला वरूणने वडिलांच्या शूटिंग सेटवर जवळून पाहिले आहे. वरूणचा मोठा भाऊ रोहितचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट बॅड बॉईजमध्ये देखील संजयची भूमिका होती. होळीच्या पार्श्वभूमीवर 10 मार्चला बद्रिनाथ की दुल्हनिया चित्रपट प्रदर्शित होत आहे.