1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ एक आठवड्यातच 100 कोटी क्लबमध्ये सामील

badrinath ki dulhania

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपट प्रदर्शनाच्या एक आठवड्यातच 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. सिनेमाने जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने गुरुवारी देशभरात 5.06 रुपयांचा गल्ला जमवला. यासोबतच चित्रपटाची देशातील कमाई 70 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सिनेमा बनवल्यापासून त्याचं प्रमोशन करण्यापर्यंत सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले होते. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ने पहिल्या दिवशी म्हणजेच 10 मार्चला 12.25 कोटी रुपये कमावले होते. वीकेण्ड असल्याने शनिवारी चित्रपटाने 14.75 कोटीं कमावले. तर 12 मार्चला सिनेमाने आतापर्यंतची सर्वाधिक 16.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सोमवारी 12.08 कोटी, मंगळवारी 7.52 कोटी, बुधवारी 5.95 कोटी तर गुरुवारी सिनेमाने 5.06 कोटी कमावले. यामुळे चित्रपटाची देशातील एकूण कमाई 73.66 कोटी झाली आहे.