शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

“बरेली की बर्फी’पासून हॉटेलची प्रेरणा

मुंबईतल्या एका हॉटेलच्या मेन्यू कार्डवर “बरेली की बर्फी’ अशा नवीन पदार्थाची नोंद झाली आहे. यामुळे या हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्वच ग्राहकांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. “बरेली की बर्फी’ हे आयुष्मान खुराना, क्रिती सेनन आणि राजकुमार रावच्या आगामी चित्रपटाचे शिर्षक आहे. या वर्षाची सर्वात रोमॅंटिक आणि चविष्ठ मनोरंजक फिल्म म्हणून “बरेली की बर्फी’ ची ओळख करून दिली जाऊ लागली आहे. त्यातील गोडवा पकडून हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलातील बर्फीला “बरेली की बर्फी’चे नाव देऊन टाकले आहे. अश्‍विनी अय्यर तिवारींनी दिग्दर्शन केलेला हा दुसरा चित्रपट आहे. तर निर्मिती जूनो चोप्रा यांची आहे. नितेश तिवारी आणि श्रेयस जैन या लेखन दिग्दर्शक जोडीने चित्रपटाचे कथा पटकथा लेखन केले आहे. “बरेली की बर्फी’ 18 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.