गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

करीना सोनी बीबीसी अर्थ चॅनलची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

करीना कपूर खान हिच्या हस्ते नुकतेच सोनी बीबीसी अर्थ चॅनलचे उद्घाटन झाले. या वाहिनीची करीना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनली आहे. या कार्यक्रमात करीनाने डिझायनर निखिल थम्पींचा सिल्व्हर कलरचा डीप नेक गाऊन परिधान केला होता. या ड्रेसमध्ये करीना नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसली. पण ड्रेसमध्ये ती मुळीच कम्फर्टेबल वाटत नव्हती. यावेळी करीनाने सांगितले, की ती चार महिन्यांची गर्भवती असताना तिने या चॅनलसाठी एक फोटोशूट केले होते. आयुष्यात प्रायोरिटी नेहमी बदलत असल्याचे करीना यावेळी म्हणाली. तैमूरच्या जन्मानंतर प्रायोरिटी बदलल्या असून आता मी मल्टी टास्किंग झाले आहे. इतर स्त्रियांप्रमाणे बाळ आणि कामाला मॅनेज करणे मी शिकले आहे, असेही तिने सांगितले.