1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. behead Aryan and AbRam if they hurt a woman: Shah Rukh

... तर तुमचं मुंडकं उडवीन: शाहरूखची आर्यन व अबरामला ताकीद

महिलांचा आदर करायला हवा यावर भर देताना शाहरूख खानने बेंगळूरूमधल्या महिलांच्या विनयभंगाच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. महिलांना चांगल्या दर्जाची वागणूक मिळायला हवी आणि पुरूषांनी महिलांचा सन्मान करायलाच हवा अशी अपेक्षा शाहरूखने व्यक्त केली आहे.

आपल्या मुलांनीही महिलांचा सन्मान केला पाहिजे त्यांना आदराची वागणूर दिली पाहिजे अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.  एवढंच नव्हे तर जर महिलांना दुखवलंत तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन व अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे. 
पुढील लेख
हृतिक रोशन आणि दुसरं लग्न!