गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (12:27 IST)

भाग्यलक्ष्मी फेम अभिनेता आकाश चौधरीचा अपघात, थोडक्यात बचावला

कधी कधी असं होत की आपण घरातून बाहेर पडताना पुढे काय घडेल याची कल्पना नसते. असेच काहीसे घडले आहे. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका भाग्यलक्ष्मीच्या अभिनेता आकाश चौधरी सोबत. आकाश एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. आकाश लाल दिव्याजवळ उभा असताना पाठीमागून भरधाव ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. आकाश आपल्या पाळीव कुत्र्यासोबत मुंबईपासून दूर सुट्टीवर जात होता.  

आकाश म्हणाला, मी माझ्या पाळीव कुत्र्या सोबत सुट्टीवर जात असताना नवी मुंबईत लाल दिव्यावर गाडी थांबवून उभे होतो. तेव्हा एका ट्रक ने आमच्या वाहनाला मागून धडक दिली. कार ड्रायव्हर चालवत होता.

आम्हाला धक्काच बसला. सीटबेल्ट लावल्यामुळे मी बचावलो. मी गाडीतून बाहेर येऊन ट्रक चालकाला जाब विचारल्यावर तो म्हणाला चूक माझी आहे मी अचानक ब्रेक दाबला नाही. मला माफ करा. मी त्याला सोडले पोलिसांनी त्याला अटक केली पण मी त्याला सोडण्याचे पोलिसांना सांगितले. ही घटना धक्कादायक होती. 
वाहनाचे मोठे नुकसान झाले. मी घरी परतलो आणि पुन्हा वेगळे वाहन घेऊन सुट्टीवर जाण्यासाठी निघालो. 
 
 
Edited by - Priya Dixit