सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2023 (11:34 IST)

ST Bus Accident भीमाशंकरला जात असलेली एसटी बस पुलावरुन ओढ्यात कोसळली

accident
ST Bus Accident गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये बसला अपघात झाला आहे. बस पुलावरुन थेट ओढ्यामध्ये कोसळली पण सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. घटनाची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य सुरु आहे.
 
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली जेथे गिरवली येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून ही एसटी बस 20 फूट खोल ओढ्यात कोसळली. बसमध्ये तेव्हा 35 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी दोन जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 
 
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.