मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (21:41 IST)

जळगावच्या भाग्यश्री तायडे दिसणार ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर

Bhagyashree Tayde from Jalgaon will be seen on the stage of 'Kaun Banega Crorepati'
जळगाव पोलिस दलातील कर्मचारी पोलिस नाईक संघपाल तायडे यांच्या पत्नी भाग्यश्री तायडे यांची ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध कार्यक्रमात निवड झाली असून सोमवार दि.१८ रोजी रात्री ९ वाजता सोनी टीव्ही हिंदी वर हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे.
 
जळगाव पोलिस दलाचे कर्मचारी व आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्रभर परिचित असलेले पोलिस नाईक संघपाल तायडे यांच्या पत्नी भाग्यश्री तायडे यांची सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध कार्यक्रमात निवड करण्यात आली आहे. सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचे कौतुक केले तसेच पोलिस नाईक संघपाल तायडे यांना गायनाची विनंती केली. यावेळी संघपाल तायडे यांनी गीत सादर केले. त्यांचे गीत ऐकून सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. दरम्यान, सोमवार दि.१८ रोजी रात्री ९ वा. सोनी टीव्ही हिंदी वर हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे.