सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 26 मार्च 2023 (13:19 IST)

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने बनारसमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. आकांक्षा ही भदोही जिल्ह्यातील चौरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारसीपूर येथील रहिवासी होती. ती भोजपुरी इंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा होती. आकांक्षा 25 वर्षांची होती आणि तिने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत ठसा उमटवला होता. आकांक्षा दुबेने चार दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावर शेवटची पोस्ट शेअर केली होती
 
आकांक्षाने 'वीरों के वीर' आणि 'कसम बदना वाले की 2' या चित्रपटात काम केले होते. अभिनेत्रीने हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही.  
 
Edited By - Priya Dixit