1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2023 (19:49 IST)

बिग बॉस 17: सलमान खानच्या फटकाऱ्यामुळे ही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल

Bigg Boss 17 Weekend Ka Vaar
बिग बॉस 17' च्या प्रत्येक वीकेंड एपिसोडमध्ये कोणी ना कोणी सलमान खानच्या रागाचा बळी ठरतो. वीकेंड का वारमध्ये संपूर्ण आठवडाभर स्पर्धकांना त्यांच्या परस्पर भांडणासाठी आणि त्यांच्या वागणुकीसाठी उत्तर द्यावे लागेल. यावेळी सलमानच्या निशाण्यावर मुनवर फारुकी आणि आयेशा खान आहेत. या वीकेंड का वारमध्ये प्रेक्षकांना या दोन स्पर्धकांप्रती होस्ट सलमानची उग्र बाजू पाहायला मिळेल.

शुक्रवारी विकेंडचा वार मध्ये सलमान ने आयेशाला फटकारले त्याने मुनवर फारुकी ला देखील  चांगलेच रागावले. या वरून घाबरून आयेशा बेशुद्ध झाली. आणि-बाणीत तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. 
सलमान खानने आयशा खानला बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश करण्याच्या हेतूबद्दल प्रश्न केला. त्यानंतर आयशा खान म्हणाली की, तिला मुनव्वर फारुकीकडून माफी हवी आहे. यावर सलमान खानने आयशा खानला राष्ट्रीय टेलिव्हिजनवर माफी मागायची आहे का, असे विचारले. सलमान खान आयेशावर चिडला आणि म्हणाला की, तिच्या कृतीवरून असे वाटत नाही की तू मुनव्वरवर रागावली आहेस.

बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये, सलमान खान मुनावर फारुकी आणि आयशा यांना फटकारतो आणि विचारतो की तुम्ही दोघे कोणता खेळ खेळता. सलमान खान मुनव्वर फारुकीला विचारतो की, जेव्हा तो त्याच्या कवितेत खूप काही सांगू शकतो, तेव्हा तो इथे गप्प का आहे? सलमान खान आयशाला विचारतो की तिने जानेवारीपर्यंत का थांबले नाही आणि माफी मागण्यासाठी तिला शोमध्ये का यावे लागले.
 
सलमान खानच्या फटकाऱ्यामुळे आयशा तुटून पडली . अंकितासमोर रडत रडत तिने स्वतःचा बचाव केला की मी हे यासाठी केले नाही. यानंतर आयशाने आपला सगळा राग मुनव्वरवर काढला. ती रडत मुनव्वरकडे जाते आणि म्हणते, “मुनाव्वर तोंड दाखवू नकोस. आजच्या नंतर आयुष्यात तोंड दाखवू नकोस."
 
वीकेंड का वार दरम्यान आयशा बेशुद्ध पडल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय आणीबाणीमुळे त्याने शो मध्येच सोडला. मात्र, बरी होताच आयशा परतणार असल्याची चर्चा आहे. 
 
Edited By- Priya DIxit