गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2023 (15:29 IST)

आर्थिक व्यवहारावरून सलमान खानच्या मेकअप आर्टिस्टला मारहाण

salman khan
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, ही बातमी त्याच्याशी संबंधित नसून त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याच्या मेकअप आर्टिस्टशी संबंधित आहे. काही लोकांनी त्याला मारहाण केली आहे. पैशाच्या व्यवहाराशी निगडीत हा विषय होता. त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.
 
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मेकअप आर्टिस्ट जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. पीडित कलाकार अभिनेता सलमान खान फिल्म्सच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतो. मुंबईत त्याला मॅनेजरसह त्याच्या साथीदारांनी बारबाहेर मारहाण केली. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. व पुढील कार्यवाही करीत आहे.
 
पालेश्वर चव्हाण असे या मेकअप आर्टिस्टचे नाव आहे. त्याने बार मॅनेजर सतीशला काही पैसे दिले होते. या पूर्वी देखील त्याने घेतले होते आणि वेळीच परत दिल्यामुळे पालेश्वर यांनी पुन्हा तीन लाख रुपये दिले.  परत मागितल्यावर सतीशने पैसे देण्यास टाळाटाळी केली. पालेश्वर पुन्हा पैसे मागायला सतीश यांच्या बार मध्ये गेल्यावर सतीश यांनी बार बंद झाले असं म्हणून त्यांना परत पाठविले. पण पालेश्वर तिथेच बसले आणि रात्री 1 वाजेच्या सुमारास त्या दोघात वादावादी झाली आणि सतीश ने आपल्या काही मित्रांना बोलवून लोखंडी रॉड ने आणि दगडफेक करून पालेश्वर यांना मारहाण केली. या हल्ल्यात पालेश्वर गंभीर जखमी झाले असून त्यांना पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले ऑन त्यांच्यावर उपचार सुरु आहे पालेश्वरच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मॅनेजर सतीशआणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल केला.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
 
Edited by - Priya Dixit