गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (10:56 IST)

Salman Khan ला फेसबुक पोस्टवरून धमकी, मुंबई पोलीस अलर्ट, अभिनेत्याची सुरक्षा वाढवली

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला फेसबुक पोस्टद्वारे धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
 
सलमान खानला धमकी देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून अभिनेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घेण्यात आला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानला मुंबई पोलिसांनी आधीच Y+ सुरक्षा दिली आहे. मात्र बिश्नोईने अभिनेत्याला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 
अलीकडेच पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घरावर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने हल्ला केला होता. खुद्द गुंडाने ही माहिती दिली. बिश्नोईने या प्रकरणी गिप्पीला उघडपणे धमकी दिली असून सलमानसोबतच्या वाढत्या मैत्रीचा परिणाम म्हणून त्याच्या घरावर हल्ला झाल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता सलमान खानला धमकी देणारी पोस्ट व्हायरल होत आहे.