सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (19:10 IST)

Bigg Boss 17: घरातून बाहेर गेलेल्या स्पर्धकामुळे बिग बॉसला दिली धमकी

टेलिव्हिजन वर सध्या बिगबॉस शो खूप गाजत आहे. हा लोकप्रिय आणि वादग्रस्त शो हा एक रिअलिटी शो आहे. सध्या या शोचा 17 वा सिझन सुरु आहे. या शो मध्ये अखेर बिगबॉस आहे कोण तो आवाज कोणाचा आहे हा प्रश्न सर्वांनाच आहे.तर बिगबॉसचा आवाज दिला आहे विजय विक्रम सिंग याने. 

एका मुलाखतीत विजय विक्रम सिंग याने सांगितले की , गेल्या दोन वर्षात एका लोकप्रिय स्पर्धकाला घरातून बाहेर काढल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली आहे.विक्रम म्हणतात की बिगबॉस शो मध्ये दोन आवाज आहे. मी फक्त प्रेक्षकांशी संवाद साधतो. घरात वेळ सांगतो. तसेच घरात काय घडले हे सांगतो. स्पर्धकांशी संवाद साधणाऱ्याचा आवाज वेगळा आहे. मी या शो मध्ये निवेदकाची भूमिका साकारत आहे.

त्यांनी सांगितले की जेव्हा एखादा स्पर्धक बिगबॉसच्या घरातून बाहेर जातो तेव्हा मला ऑनलाईन ट्रोल केले जाते. पण मी हे सांगू इच्छितो की हे सर्व काही प्रेक्षकांची पसंतीवर असते.ही सर्व लोकांची मते असतात. माझी स्पर्धकाला काढण्यात काहीही भूमिका नाही. पण दर्शक ऐकत नाही आणि मला आणि माझ्या कुटुंबियांना धमक्या देतात. बिगबॉस असणारा आवाज त्याच्या नसून दुसऱ्याचा आहे असे विजय सांगतात. त्यांना मिळणाऱ्या धमक्या येणं चुकीच्या असल्याचे ते सांगतात.   
 
Edited by - Priya Dixit