सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (12:40 IST)

Bigg Boss OTT Grand Finale: शेवटच्या टप्प्यावर 'बिग बॉस ओटीटी', ग्रँड फिनाले लाईव्ह कधी आणि कुठे जाणून घ्या?

'बिग बॉस ओटीटी'(Bigg Boss OTT)चा प्रवास शेवटच्या टप्प्यावर आहे. या शोच्या ग्रँड फिनालेला फक्त 3 दिवस शिल्लक आहेत.या मध्ये दिव्या अग्रवाल,शमिता शेट्टी,राकेश बापट,निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीनसह स्पर्धक अंतिम आठवड्यात पोहोचले आहेत.शोचे चाहते बिग बॉस ओटीटीचा मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.जर आपण रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी (ओव्हर द टॉप) च्या ग्रँड फिनालेबद्दल खूप उत्साहित असाल तर ही बातमी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 
 
अहवालानुसार, शोच्या समाप्तीपूर्वी दोन स्पर्धक या खेळातून बाहेर जातील आणि उर्वरित 4 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचतील. असे म्हटले जात आहे की जे काही स्पर्धक जनतेच्या मतांनंतर टिकून राहतील, ते 'बिग बॉस 15'(Bigg Boss 15) चा एक भाग बनतील. फिनालेच्या दिवशी करण जोहर होस्ट करून विजेत्याचे नाव जाहीर करतील.
 
 'बिग बॉस ओटीटी' सुमारे 5 आठवड्यांपूर्वी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी सुरू झाला. शोमध्ये कनेक्शन स्टार्स घरात शिरले होते. शो शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. 
 
'बिग बॉस ओटीटी'चा फिनाले 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वूट सिलेक्ट वर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. आपल्या स्क्रीनवर शेवट पाहण्यासाठी आपल्याकडे वूट प्रीमियम सब्सक्रिप्शन असणे आवश्यक आहे.