सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (22:34 IST)

बिपाशाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला,बाळाला घेऊन घरी आली

बिपाशा बसू नुकतीच आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्रीच्या घरात पाळणा हलला आहे. बिपाशा आणि करण १२ नोव्हेंबरला आई-वडील झाले. मुलाच्या जन्मानंतर करण सिंग ग्रोव्हरने पोस्ट शेअर करून मुलगी आणि तिच्या नावाची माहिती दिली. आई-वडील झाल्यानंतर दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. आता बिपाशाला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

12 नोव्हेंबरला पालक झाल्यानंतर करणने आपल्या मुलीचा फोटो शेअर करून तिचे नाव उघड केले. बिपाशाच्या मुलीचे नाव देवी बासू सिंग ग्रोवर ठेवले आहे. करण आणि बिपाशाने 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते.लग्नाच्या सहा वर्षानंतर बिपाशाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.बिपाशाला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ज्याचे पहिले फोटो समोर आले आहेत.बिपाशा आणि करण त्यांच्या मुलीला हातात  घेऊन जाताना दिसत आहेत.तिचा चेहरा दिसत नाही. बिपाशा आणि करण दोघेही काळ्या ड्रेस मध्ये दिसत आहे.

Edited by - Priya dixit