शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2024 (16:42 IST)

कपिलच्या कॉमेडी शो मध्ये बॉबी देओलच्या डोळ्यात अश्रू आले

Bobby Deol
अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल हे लवकरच कपिल शर्माच्या नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या एका एपिसोड मध्ये एकत्र दिसणार असून त्याचा प्रोमोहीसमोर आला आहे. या मध्ये बॉबी आणि सनी हे दोघे ढसाढसा रडताना दिसत आहे. 

व्हिडीओ मध्ये सनी वाईट दिवसांची आठवण करत बोलत आहे की, आम्ही 1960 पासून प्रसिद्धीच्या झोतात आहोत. पण अनेक वर्षे काहीच होत नव्हते काहीच कळत नह्व्त माझ्या मुलाचं लग्न झालं, गदर चित्रपट आला, त्यापूर्वी बाबांचा चित्रपट आला, काहीच कळेनासे झाले देव कुठं आहे. हे ऐकतातच बॉबी ढसाढसा रडू लागले त्यांचे डोळे पाणावले. नंतर सनी म्हणाले नंतर एनिमल चित्रपट आला आणि मग फट्टे ही चकदे असं म्हणत सनी हसू लागले. हे ऐकून बॉबीच्या चेहऱ्यावर देखील हसू आलं.

सनी आणि बॉबी देओलचे बाँडिंग खूप चांगले आहे. दोन्ही भावांमध्ये अपार प्रेम आहे. या शोदरम्यान बॉबीने सनीला रिअल लाइफ सुपरमॅन म्हटले होते. ॲनिमल फेम अभिनेता बॉबी देओल पुढे म्हणाला, "जर कोणी सुपरमॅन इतका मजबूत असेल तर तो त्याचा भाऊ (सनी देओल) आहे." बॉबीचे हे शब्द ऐकून सनी म्हणतो की तो बाहुबली आहे.  
एपिसोडचा टिझर इंस्टावर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले आहे. देओल भाऊ लवकरच या कॉमेडीच्या शो मध्ये चाहत्यांना यमला पगलाचे वेड लावण्यासाठी लवकरच येत आहे. 

Edited By- Priya Dixit