गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2017 (14:18 IST)

'पद्मावती'साठी दीपिकाने घेतले बारा कोटी!

हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेल्या दीपिकाने आता ट्रिपल एक्स मधून हॉलीवूडमध्ये पर्दापणही केलेले आहे. जगातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिच्य नावाची फोर्ब्स नेही नोंद केली होती. सध्या ती संजय लीला भन्साळीच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तिने तब्बल बारा कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते. संजय लीला भन्साळीच्या रामलीला आणि बाजीराव मस्तानी सारख्या सुपरहिट, चित्रपटांमध्ये दीपिका झळकली आहे. त्यामुळे पद्मावती निर्माण करण्याचे ठरवले त्यावेळी संजयने दीपिकाचाच विचार केला होता. आपल्या पहिल्याच ओम शांती ओम पासून सुपरहिट चित्रपटांची रांगच लावलेल्या दीपिकाने या चित्रपटासाठी आपले मानधन बेसुमारे वाढवले तरीही तिलाच यामध्ये घेण्यात आले.