रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 25 जानेवारी 2023 (08:34 IST)

पठाणच्या तिकीटांचं बुकींग जे एवढ जोरात सुरूय, जे आत्तापर्यंत झालं नाही

SRK pathan look
'पठाण' २५ जानेवारीला सर्वच चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी शाहरूखचे चाहते क्रेझी झाले आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जबरस्त प्रतिसाद मिळतोय. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय धमाका करतो, ते बघूच. पण, सध्या शाहरूखने एका पाठोपाठ एक धमाके करतोय. होय, गेल्या काही दिवसांपासून शाहरूख सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय झालेला दिसतोय. शाहरुखच्या पठाणचं बुकींग पाहून अजय देवगणनेही प्रतिक्रिया दिली. आजपर्यंत एवढं चांगलं बुकींग कुठल्याही चित्रपटाला मिळालं नसल्याचं अजय देवगणने म्हटले. तसेच, ही चांगली गोष्ट असल्याचंही तो म्हणाला. आता, अजयच्या या विधानावर शाहरुखने प्रतिक्रिया देत अजयचे आभार मानले आहेत. 
 
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायकॉट ट्रेंडमुळे निर्मात्यांमध्ये काहीही भीती निर्माण झाली आहे. मात्र, शाहरुखच्या पठाणकडून चित्रपटसृष्टीमुळे मोठी अपेक्षा आहे. या चित्रपटातून आशावादही दिसतोय. म्हणूनच, बॉलिवूड सेलिब्रिटी पठाणचं स्वागत करताना दिसत आहेत. अजय देवगणच्या भोला चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच लाँच झाला. याप्रसंगी बोलताना अजय म्हणाला, फिंगर क्रॉस करुन पाहा मला तर वाटते की चित्रपट रिलीज व्हायला पाहिजे. तो सुपर-डूपर हिट होवो. ही संपूर्ण इंडस्ट्री एक आहे. आता, पठाण रिलीज होत आहे. जसं मी ऐकतोय, पठाणच्या तिकीटांचं बुकींग जे एवढ जोरात सुरूय, जे आत्तापर्यंत झालं नाही, असे अजयने म्हटले. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor